एक्स्प्लोर
Pune Leopard Menace: नरभक्षी बिबट्याला Put Down करण्याची परवानगी द्या', फडणवीसांची केंद्राकडे मागणी
पुणे जिल्ह्यात (Pune District) बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर (Leopard Attack Death) राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे, तर दुसरीकडे आरोग्य योजनेचा (Health Scheme) विस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 'एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन (Put Down) करण्याची पण परवानगी केंद्र सरकारने द्यावी', अशी मागणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) आता २३९९ आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. काही चिन्हित आजारांसाठी १० लाखांपर्यंत खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. महिला वर्ल्ड कप विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या स्मृती मानधना (Smriti Mandhana), जिमीमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि राधा यादव (Radha Yadav) या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, राज्यातील रखडलेल्या २१ मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















