एक्स्प्लोर
Zero Hour Farmers Protest : बच्चू कडूंच्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी, कर्जमाफीसाठी महाएल्गार
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीवरून वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये (Nagpur) हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असून, या आंदोलनात विजय जावंधिया (Vijay Jawandhiya) आणि रवींद्र तुपकर (Ravikant Tupkar) सारखे नेतेही सामील झाले आहेत. 'शेतकऱ्यांना मूर्ख बनवून सत्तेत येता येतं हे गेल्या अकरा वर्षांपासून सिद्ध झालेलंय,' असा थेट आरोप शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. चर्चेदरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वतीने कर्जमाफी शंभर टक्के होणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक शेतकरी आणि विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विजय जावंधिया यांनी आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेचा संदर्भ देत सरकारवर टीका केली आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, सरकारच्या प्रतिनिधीने जल नियोजनाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करत कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाईल असे स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

















