Maharashtra Politics: दादांचा 'खवय्या' अंदाज! अजित पवारांनी घेतला भेळ-पाणीपुरीचा आस्वाद
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील (Pune) खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित 'राष्ट्रवादी परिवार मिलन' (Rashtrawadi Parivar Milan) कार्यक्रमात हजेरी लावली. राज्याच्या राजकारणात नेहमी व्यस्त असणाऱ्या अजित पवारांचा या कार्यक्रमात एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत बसून भेळ (Bhel) आणि पाणीपुरीसारख्या (Panipuri) चाट पदार्थांवर ताव मारला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या या साधेपणाची आणि खवय्येगिरीची दृश्ये सध्या चर्चेचा विषय ठरली असून, त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement