Farmers Relief: 'पुढच्या 15-20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे', मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
Continues below advertisement
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत मदतीच्या पॅकेजचा आढावा घेतला जाईल. 'पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील,' असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आतापर्यंत 8 हजार कोटी रुपये 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की, येत्या 15 ते 20 दिवसांत 90 टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement