Maha Civic Polls: जात प्रमाणपत्र नसतानाही निवडणूक लढवता येणार? 'या' एका कागदावर अर्ज करता येणार

Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद (Nagar Parishad) आणि नगर पंचायत (Nagar Panchayat) निवडणुकांसाठीची नियमावली जाहीर केली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन नामनिर्देशन (Online Nomination) आणि जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील (Caste Validity Certificate) महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे. आयोगाच्या नियमांनुसार, ‘मात्र असा उमेदवार अंतिमरीत्या निवडून जर आला तर त्याला सहा महिन्यांच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील’. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडे अर्ज भरण्याच्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास, त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती सादर करून नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. याशिवाय, नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना प्रभागातील दोन ते तीन सदस्यांसाठी आणि अध्यक्षासाठी एक मत द्यावे लागेल. नगर पंचायतमध्ये एक सदस्य आणि एका अध्यक्षासाठी मतदान होईल. उमेदवारांना आपले अर्ज केवळ राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइनच सादर करावे लागतील आणि त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola