Maharashtra Civic Polls: 'ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढणार', Fadnavis यांची मोठी घोषणा!

Continues below advertisement
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) भाजपची (BJP) भूमिका स्पष्ट केली आहे. 'ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार', अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली आहे. जिथे महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष एकमेकांचे प्रमुख स्पर्धक आहेत, तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवून निकालानंतर एकत्र येण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, मुंबईत (Mumbai) महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यात काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढून नंतर एकत्र येण्याची भाजपची रणनीती समोर आली आहे. मतदार याद्यांवरुन होणाऱ्या टीकेला पुराव्यानिशी उत्तर देणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच, '२०२९ नंतर दिल्लीत जाण्याचा विचार करू', असे म्हणत त्यांनी सध्यातरी महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola