एक्स्प्लोर
Farmer Relief | शेतकऱ्यांसाठी आज मोठा निर्णय, Cabinet Meeting मध्ये मदतीची शक्यता
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास सात लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर नुकसान झाले असून, एकसष्ठ हजाराहून अधिक पशुधन मृत्युमुखी पडले आहे. नऊ हजार दोनशे त्रेसष्ट हेक्टर जमीन खरडून गेल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ओला दुष्काळ असताना जशी मदत केली जाते, ती सर्व देण्याची सरकारची तयारी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन आणि विद्यार्थ्यांना शुल्कमाफी यांसारखे महत्त्वाचे निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. दुरुस्त होऊ न शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार आणि खरडून निघालेल्या जमिनीसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदत देण्याचा नियम आहे. मात्र, तो बदलून दोन्ही प्रकारच्या जमिनींसाठी एकच कायमस्वरूपी मदत द्यावी आणि मदतीत वाढ करावी, असाही सरकारचा विचार आहे. यासाठी चौदा ते पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता असून, त्याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















