Board Exams 2026: दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 12 वी 10 Feb तर 10 वी 20 Feb पासून
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board) 2026 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार बारावीची बोर्डाची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये घेतली जाईल, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात होणार आहे. यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित केल्या जातील. तर, दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement