Maharashtra : माजी आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; महावितरणाच्या कृषीपंप वीजतोडणीच्या कारवाईवर संताप

Continues below advertisement

अहमदनगरच्या नेवासामध्ये कृषीपंप वीज तोडणी कारवाईविरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी गळ्याला फास लावत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली होती. नेवासा तालुक्यात महावितरण विभागाकडून वीजबिल थकवणाऱ्यांविरोधात कृषीपंप वीज तोडणी कारवाई सुरु आहे. या कारवाईविरोधात मुरकुटेंच्या नेतृत्वात नेवासा वीज वितरण कार्यालयात भाजपनं चार तास ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्याकडून ५ हजार रुपये न घेता ३ हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram