एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Mahajan Family War: 'जे घराला सावरू शकले नाही, ते देशाला कसे सांभाळणार?', प्रमोद महाजनांवरच प्रश्नचिन्ह
महाजन कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन आणि दीर प्रकाश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सारंगी महाजन यांनी मुंडे भावंडांवर जमीन लाटल्याचा आरोप केल्यानंतर, प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेत थेट प्रमोद महाजन यांच्या हत्येमागील कारणांवरच खळबळजनक दावा केला आहे. 'आमच्या घरातलंच निस्तरता आलं नाही त्यांना, ते देशाला कशी सांभाळू शकले असते?', असा थेट सवाल करत सारंगी महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या पंतप्रधान होण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याला उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी, प्रमोद महाजन यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करणे हाच प्रवीणचा उद्देश होता, असा गौप्यस्फोट केला. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन विरोधात कोर्टात साक्ष दिल्याने सारंगी महाजन मुंडे कुटुंबावर आरोप करत असल्याचेही प्रकाश महाजन म्हणाले. या वादामुळे मुंडे आणि महाजन कुटुंबातील राजकीय संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















