Maharashtra Politics 'तुम्ही सुपात, आम्ही जात्यात...', Mahadev Jankar यांचा Shinde-Pawar यांना इशारा
Continues below advertisement
राज्यात 'ऑपरेशन लोटस'च्या (Operation Lotus) चर्चा सुरू असताना, भाजपचे (BJP) जुने सहकारी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'आज आम्ही जात्यात आणि तुम्ही सुपात आहात पण तुम्हालाही जात्यात यायचं आहे हे लक्षात असू दे,' अशा शब्दात महादेव जानकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारावरून सुरू असलेल्या वादात त्यांनी उडी घेतली. मुंडे साहेबांनी स्वतःच मला त्यांचा राजकीय वारसदार म्हटले होते, असे जानकर म्हणाले. त्यांच्या मते, गोपीनाथ मुंडे यांची पहिली वारसदार पंकजा मुंडे, दुसरी प्रितम मुंडे, तिसरी यशस्वी आणि चौथे वारसदार स्वतः महादेव जानकर आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement