OBC Protest: 'खऱ्या OBC ना तिकीट द्या, नाहीतर Correct कार्यक्रम करू', Laxman Hake यांचा पक्षांना इशारा

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिला आहे. 'जिजी माणसं बोगस कुणबीकरणाद्वारे (Kunbi certificates) ओबीसीला तिकीटं देतील, जेजे पक्ष तिकीटं देतील त्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू,' असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला डीएनए ओबीसी असल्याचा दावा केल्याने, आता तिकीट वाटपातून ते सिद्ध करावे, असे आव्हानही हाके यांनी दिले आहे. आगामी ७७ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत जे पक्ष मूळ ओबीसी उमेदवारांऐवजी कुणबी प्रमाणपत्रधारक मराठा समाजाच्या उमेदवारांना तिकीट देतील, त्यांच्याविरोधात महाराष्ट्रात आंदोलन तीव्र केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जातीय राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola