Maharashtra Politics: 'विखे पाटील महामूर्ख माणूस', Laxman Hake यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
OBC नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आता आपला मोर्चा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे वळवला असून, त्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. 'विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे', असा थेट हल्ला लक्ष्मण हाके यांनी केला आहे. विखे पाटील हे 'गोगलगाय आणि पोटात पाय' असून त्यांची कुठलीही राजकीय विचारधारा नाही, केवळ कारखाने चालवणे आणि पैसे कमावणे हीच त्यांची विचारधारा असल्याचा आरोप हाके यांनी केला. मराठा समाजाला कधीही कोणी विरोध केला नाही या विखे पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, ओबीसींनी कधी कुणाला विरोध केलाय का? असा प्रतिप्रश्न हाके यांनी विचारला. विखे पाटील हे मनोज जरांगे यांची भाषा बोलत असून, त्यांना ओबीसी समाज मतपेटीतूनच उत्तर देईल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement