Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी दीड तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्याने जरांगे उपोषणावर ठाम राहिले. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्टिमेट दिला आहे. मनोज जरांगे जर बाजेवर बसून आंदोलन करत असतील तर आम्ही ढेकळात आंदोलन करू असंही हाकेंनी म्हटलंय.मनोज जरांगे यांनी आज जे काही आंदोलन सुरू केलं आहे, हे आंदोलन जर चालू राहणार असेल आणि ओबीसीच्या ताटातील त्यांच्या हक्काचं अधिकाराचं आरक्षण हिरावलं जाणार असेल तर, आम्ही उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक असं आंदोलन करणार आहोत. जरांगे बाजेवर बसले आहेत आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आंदोलन जाहीर करणार आहोत, उद्या गाव, वेळ आणि ठिकाण आम्ही उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत, असंही हाकेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय