Lakhimpur Kheri violence : महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या Maharashtra Bandh ला भाजपचा विरोध

Continues below advertisement

उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वरुन महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आलेत. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. कायदा चिरडला जातो, गुन्हेगारांना मोकाट सोडलं जातं हे सर्व देशातील जनतेनं पाहिलं.. त्यामुळे या बंदमध्ये लोक स्वत: सहभागी होतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय... मात्र दुसरीकडे भाजपने या बंदला विरोध दर्शवलाय. दडपशाही करुन मुंबई बंद ठेवू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय.  जे लोक दुकानं सुरु ठेवतील त्यांना भाजप संरक्षण देईल असंही भातखळकरांनी म्हटलंय. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram