Lahore Fort Special Report |'माझा'वर लाहोर किल्यावरचा रिपोर्ट,रघुनाथराव पेशव्यांनी भेट दिल्याची नोंद
चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हरेजच्या निमित्तानं पाकिस्तान दौऱ्याची संधी लाभलेल्या क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी तिथल्या वास्तव्यात लाहोर किल्ल्यालाही भेट दिली. प्रभू श्रीरामाचे सुपुत्र लवानं वसवलेलं शहर म्हणून या शहराचं नाव लाहोर असा इतिहास पाकिस्तानात आजही सांगितला जातो. लाहोरच्या या किल्ल्याला रघुनाथराव पेेशव्यांनी भेट दिल्याचीही नोंद आहे. पाहूयात सुनंदन लेले यांचा स्पेशल रिपोर्ट.