एक्स्प्लोर
Konkan Railway Update: दिवाळीपूर्वी कोकणवासियांना मोठा दिलासा, आजपासून रेल्वे सुसाट धावणार!
कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर आज, २१ ऑक्टोबरपासून, बिगर-पावसाळी म्हणजेच नियमित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे गाड्या आता जलद गतीने धावणार आहेत. 'दरवर्षी लागू होणारे पावसाळी वेळापत्रक यंदा २० ऑक्टोबर रोजी संपले असून, २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू होणार आहे'. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव, विशेषतः दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन, गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. मात्र, यंदा मान्सूनपूर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्याने, पावसाळी वेळापत्रक लवकर संपवून नियमित वेळापत्रक लागू झाले आहे. १० जून ते २० ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू होते. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून, त्यांचा प्रवास आता अधिक गतिमान होईल.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

















