कोल्हापुरातील महाद्वार रोडवर रविवारी रात्री एक मद्यधुंद कारचालकाने थरार माजवला. वेगात असलेल्या कारने महिलांसह दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण किरकोळ जखमी झाले. संतप्त जमावाने कारचालकाला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अधिक तपास सुरु असून, अपघातग्रस्त वाहन आणि इतर पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. महाद्वार रोडसारख्या गर्दीच्या भागात अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चालकाचा मेडिकल अहवाल घेऊन कारवाईचे संकेत दिले आहेत.