Argeria Sharadchandraji | ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील वनस्पतीला शरद पवार यांचं नाव
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
01 Apr 2021 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एक नवी वनस्पती कोल्हापुरातील दोन शास्त्रज्ञांनी समोर आणली आहे. विशेष म्हणजे त्या वनस्पतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याचं नाव देण्यात आलं आहे. ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नावानं संशोधन केलेल्या वनस्पतीला आता ओळखलं जाईल. कोल्हापुरातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि त्याचे सहकारी डॉ. प्रमोद लावंड यांनी हे संशोधन केलं आहे. जी वनस्पती या दोन शास्त्रज्ञांनी शोधून काढलीय ती गारवेल कुळातील आहे. कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या रिडिया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून याचे प्रकाशन करण्यात आलंय.