एक्स्प्लोर
Saptashrungi Transgender Chhabina | नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक पार पडली. देशभरातील तृतीयपंथीयांनी या मिरवणुकीसाठी हजेरी लावली. गेल्या ऐंशी वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. गाभाऱ्यामधील देवीच्या मूर्तीला शिवालय तळ्यावर शाही स्नान घालून साडीचोळी आणि दागिने परिधान केले जातात. देवीच्या छबिन्याची सजावट करून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. हा सोहळा बघण्यासाठी सप्तश्रृंगी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महामंडळेश्वर पायल नांदगिरे यांनी सांगितले की, "छबिना हा आतापर्यंत आमचा ऐंशी वर्षांचा इतिहास आहे, पण हा आम्ही खंडित नाही करणार आहे आणि येथून पुढे ही खंडित नाही करणार आहोत." त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आणि सर्व प्रजाजन सुखी ठेवण्याचे आवाहनही केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















