Solapur News : 'बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने छळ', Solapur च्या Kistt Finance मधील 10 जणांवर गुन्हा
Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) किस्त फायनान्स (Kistt Finance) कंपनीत महिला कर्मचाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या ब्रांच मॅनेजरसह (Branch Manager) दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला', असा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या सोलापूर (Solapur) ब्रांचमध्ये एकूण चौदा कर्मचारी असून, त्यात पीडित महिला एकमेव होती. तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची (Washroom) व्यवस्था नव्हती, तसेच इतर कर्मचारी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत असत, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कंपनीच्या एचआर (HR) विभागावरही गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement