Kishor Tiwari | अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं आरएसएसला पत्र | ABP Majha
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या राजकीय कोट्या देखील करत असतात. यावरुन बऱ्याचदा त्या ट्रोल देखील होतात. मात्र आता अमृता फडणवीस यांना आवरा अशा आशयाचं पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. नुकतंच भैय्याजी जोशींनी फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस या जर असेच संबंध वाईट करत राहिल्या तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील, असं तिवारी यांनी पत्रात म्हटलं आहे. सोबतच तिवारी यांनी अगदी जशोदाबेन, रश्मी ठाकरे, कांचन गडकरी, शर्मिला ठाकरे ह्यांच्या वागण्याचे दाखले दिले आहेत. तर मला जे म्हणायचे होते ते मी ट्विटमध्ये म्हटले आहे. पत्र मी बघितले नाहीये, वाचले ही नाहीये त्यामुळे मला त्यावर आता काही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
Continues below advertisement