एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Water Crisis: 'घरं परत घ्या नाहीतर CIDCO कार्यालयात राहू', Kharghar स्वप्नपूर्तीमधील रहिवाशांचा इशारा
पनवेलमधील कामोठे, कळंबोली आणि विशेषतः खारघरमधील सिडकोच्या (CIDCO) स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवासी तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झाले आहेत. 'सिडको सगळं पाणी विकतं', असा गंभीर आरोप करत रहिवाशांनी व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. ऐन दिवाळीतही पाणी नसल्याने नागरिकांचे हाल झाले, त्यांना सण साजरा करता आला नाही. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास विकलेली घरे परत घेऊन पैसे द्या किंवा आम्ही थेट सिडको कार्यालयात राहायला येऊ, असा थेट इशारा हजारो कुटुंबांनी दिला आहे. पाणी नसल्याने महालक्ष्मी पूजन आणि दिवाळीचा पहिला दिवसही कोरडा गेल्याची व्यथा महिलांनी मांडली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















