Kartiki Ekadashi: ठाण्यात 51 फुटांची विठ्ठल मूर्ती, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Continues below advertisement
कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) ठाण्यातील (Thane) उपवन (Upvan) येथे विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी या ५१ फूट उंच विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले होते. यानंतर, 'कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले', अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पंढरपूरप्रमाणेच ठाण्यातही भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळत असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली आहे. कोल्हापूरचे शिल्पकार सतिश घार्गे यांनी ही मूर्ती साकारली असून, या कार्यक्रमाला विविध राजकीय नेते आणि हजारो वारकरी उपस्थित होते. आज एकादशीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement