Pilgrimage Rush: दक्षिण काशी Harihareshwar मध्ये भक्तांचा महासागर, कार्तिक एकादशी यात्रेला प्रारंभ

Continues below advertisement
रायगडमधील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. सकाळपासूनच मंदिरात आणि परिसरात भक्तांची अलोट गर्दी उसळली असून, शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. आज सकाळी पालखी पूजनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि टाळमृदंगाच्या तालावर भाविकांनी पालखीची नगर प्रदक्षिणा केली. या यात्रेचा मुख्य भाग असलेली 'कोस प्रदक्षिणा' सुद्धा सुरू झाली आहे, ज्यामध्ये भाविक मंदिराभोवतीच्या चार डोंगरांना सुमारे १२ किलोमीटर लांबीची प्रदक्षिणा घालतात. हा प्रदक्षिणा मार्ग दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola