Kalyan Clash: 'आमच्या महिलांना मारलं, मोबाईल हिसकावले'; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

Continues below advertisement
कल्याणमध्ये (Kalyan) फटाक्यांच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारामारी आणि दगडफेकीची घटना समोर आली आहे. या घटनेतील एका प्रत्यक्षदर्शीने 'ABP माझा'चे प्रतिनिधी सुरेश काटे (Suresh Kate) यांना सविस्तर माहिती दिली. 'त्या लोकांनी आमच्या इथल्या ज्या महिला होत्या त्यांना मारलं, मोबाईल आणि चैन हिसकावण्यात आले,' असा गंभीर आरोप एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास फटाके वाजवण्यावरून वादाची सुरुवात झाली. त्यानंतर रामवाडी (Ramwadi) नावाच्या भागातून आलेल्या जमावाने स्थानिक महिलांना मारहाण केली आणि दगडफेक सुरू केली, असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 'काही दगडं आमच्या आजूबाजूने सुद्धा गेल्या, आम्ही वाचलो,' असे सांगत त्यांनी या घटनेची भीषणता वर्णन केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola