Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील

नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही  भाजपात येण्यासाठी धडपडतील .. ईव्हीएम आणि मतचोरीवर बोलणारे विरोधक जनतेतच नाहीत .. जयकुमार गोरे यांची तुफानी टोलेबाजी ..
मंगळवेढ्यात नगरपालिका प्रचाराचा फुटला नारळ  सातत्याने पराभूत होऊनही विरोधी नेते आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत .. कधी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला म्हणतात तर कधी मत चोरी झाली म्हणतात .. खरंतर घोटाळा यांच्या मेंदूत झाला आहे आणि चोरी यांच्या मेंदूची झाली आहे अशी टोलेबाजी करत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा नगरपालिका प्रचाराचा नारळ फोडला.  आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढ्यातून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी विराट रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. सुरुवातीला नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व नेते सभास्थानी पोहोचले. वेळी नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.  सुरुवातीला आज शहीद झालेले मंगळवेढ्याचे सुपुत्र बाळासाहेब पांढरे यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola