Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision Exclusive

मुंबई : पुत्रीप्रेम तर आम्हाला अनुभवायला मिळाले नाही. कारण पुत्री खासदार असताना त्यांना कधी मंत्री केले नाही. त्यांच्या तीन टर्म खासदारकीच्या झाल्या. जेव्हा संधी होती तेव्हा शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सोडून दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना काम करताना पाहिले आहे. आदित्य मंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे हे चर्चेत आणि निर्णयात कधीच सहभागी नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दिले. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola