Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati Byelection Result 2026) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुनेत्रा पवार 26 हजार 773 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. तर त्यांच्याविरोधात तब्बल 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. करुणा मुंडे (Karuna Munde) आणि अभिजीत बिचुकलेसुद्धा (Abhijit Bichukale) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना किती मतं मिळाली? जाणून घेऊयात सविस्तर...
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6500 मतांची आघाडी घेतली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे 58.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत 71.86 टक्के मतदान झालेलं. या मतदारसंघात तीन लाख 84 हजार 579 मतदार असून, त्यापैकी दोन लाख 24 हजार 87 मतदारांनी मतदान केलं. टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6500 मतांची आघाडी घेतलेली. तर, आता तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 26 हजार 773 मतांनी आघाडीवर आहेत.