एक्स्प्लोर
Akhtar-Ali Feud: 'कुणाचं राक्षसी मन दुखावलं असेल तर...', Javed Akhtar यांच्यावर Lucky Ali यांची खोचक टीका
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि गायक लकी अली (Lucky Ali) यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच पेटला आहे. 'कुणाचं राक्षसी मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, राक्षसांनाही भावना असतात', अशा खोचक शब्दांत लकी अली यांनी जावेद अख्तर यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. एका जुन्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी 'हिंदूंनी मुस्लिमांसारखं होऊ नये', असं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर, लकी अली यांनी अख्तर यांच्यावर टीका करत 'ते कधीच ओरिजिनल नव्हते' असं म्हटलं आणि पुढे अपशब्द वापरले. यानंतर टीकेची झोड उठताच अली यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्यातही त्यांनी अख्तरांना 'राक्षस' संबोधल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement

















