ACB Trap Jalna Commissioner 10 लाखांची लाच घेताना संतोष खांडेकरांना अटक, एसीबीकडून घराची झडती

Continues below advertisement
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दहा लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. 'आनंद वाटला, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केल्याने स्वागतासाठी आम्ही फटाके फोडले आहेत,' अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. तक्रारदार कंत्राटदाराकडून कामांची बिलं मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी वीस लाखांची लाच मागितली होती, त्यापैकी दहा लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच शहरातील डीपी रोड, सिमेंट काँक्रीटीकरण आणि मनपाच्या मजल्याच्या कामांच्या मंजुरीसाठी मागण्यात आली होती. या कारवाईनंतर, एसीबीच्या पथकाकडून खांडेकर यांच्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घरांची झडती घेण्यात येत आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola