Dadar Kabutar Khana: 'गरज पडल्यास शस्त्र उचलू', Jain Muni Nileshchandra Vijay यांचा इशारा, उपोषणाची घोषणा
Continues below advertisement
दादरमधील कबूतरखाना (Dadar Kabutar Khana) बंद केल्याच्या निर्णयामुळे जैन समाजात (Jain community) तीव्र असंतोष पसरला असून, जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni Nileshchandra Vijay) यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'येणाऱ्या एक तारखेला आझाद मैदानमध्ये परवानगी घेऊन तिथे मी आमरण उपोषणासाठी बसायची माझी पूर्ण तयारी आहे,' असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. 'हिंदूंचे सरकार असताना प्राण्यांवर असा अत्याचार का व्हावा?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी, या निर्णयाचा निषेध करत त्यांनी गरज पडल्यास शस्त्र उचलण्याची भाषा केली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने आता उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement