Kabutarkhana Row : जैन मुनींसाठी माणसापेक्षा कबुतरांचा जीव महत्त्वाचा? Special Report
Continues below advertisement
मुंबईतील कबुतरखान्यांवरून (Kabutarkhana) सुरू झालेल्या वादात जैन मुनी कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) आणि निलेश मुनी (Nilesh Muni) यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. 'एखादा दुसरा व्यक्ती मेल्यामुळे काय होतं,' असा संतापजनक प्रश्न कैवल्य रत्न महाराज यांनी विचारला. आम्ही घरोघरी प्रचार केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले, असा दावाही स्वरूपानंदजी महाराजांनी केला. या वादाला राजकीय वळण देत, निलेश मुनी यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'शांतिदूत जनकल्याण पार्टी' (Shantidoot Janakalyan Party) या नव्या पक्षाची घोषणा केली. कबुतरांमुळे होणाऱ्या फुफ्फुसांच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Dr. Manisha Kayande) यांनी जैन मुनींवर टीका केली आहे, तर मनसेने (MNS) राजकीय भाष्य करण्यापेक्षा प्रबोधन करण्याचा सल्ला दिला आहे. हा वाद आता धार्मिक आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरून राजकीय पातळीवर पोहोचला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement