Jain Monk Row: '...तर कोरोनाच्या विषाणूची पूजा करायची का?', Manisha Kayande यांचा मुनींना सवाल
Continues below advertisement
मुंबईतील कबुतरखाना वादावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी जैन मुनींच्या विधानांवर जोरदार टीका केली आहे. 'घरात चार उंदीर आले, मग आपण गणपतीचं वाहन म्हणून त्याचं असं, असं नमस्कार करत फिरायचं का?', असा थेट सवाल मनीषा कायंदे यांनी केला. कबुतरांना पक्षाचा दर्जा देण्याच्या किंवा त्यांच्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला तरी फरक पडत नाही या जैन मुनींच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक आधार असायला हवा, असे सांगताना त्यांनी कोरोना महामारीचे उदाहरण दिले. आपण डॉक्टर्स आणि लसींमुळे कोरोनावर मात केली, त्या विषाणूची पूजा नाही केली, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement