एक्स्प्लोर
Pune Protest: 'व्यवहार रद्द न झाल्यास अन्नत्याग आंदोलन', जैन गुरु Guptinandji यांचा इशारा
पुण्यातील (Pune) जैन हॉस्टेलच्या (Jain Hostel) विक्री प्रकरणावरून जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला असून जैन गुरु गुप्तीनंदजी (Jain Guru Guptinandji) यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'जैन हॉस्टेलच्या विक्रीचा व्यवहार रद्द न झाल्यास एक नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा', जैन गुरु गुप्तीनंदजी यांनी इशारा दिला आहे. या प्रकरणी जैन समाजाची आज एक चिंतन बैठक होणार असून, यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा आणि रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या (Seth Hirachand Nemchand Digambar Jain Boarding) या जागेचा व्यवहार रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजाने यापूर्वीच एक मोठा मोर्चा काढला होता.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















