एक्स्प्लोर
Ajit Pawar Viral Video : गुंडांना अभय देणार का? अजित पवारांना माझाचे प्रश्न
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आयपीएस अंजना कृष्णा यांचे नाव समोर आले आहे. अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम येथील आहेत. त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत ३५५ वा रँक मिळवून आयपीएस केडर प्राप्त केले. सुरुवातीला त्यांनी त्रिवेंद्रममध्ये एसीपी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये त्या कार्यरत झाल्या. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. अंजना कृष्णा यांची ओळख अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी आहे. त्यांनी करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला. दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील कुर्डु येथे अवैध मुरूम उत्खननावर कारवाई सुरू होती. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना अंजना कृष्णा यांनी आपली ठाम भूमिका घेतली. कायद्यानुसार सुरू असलेली कारवाई थांबवण्यास त्यांनी नकार दिला. नियम आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा




















