IND vs AUS Champions Trophy : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलं
IND vs AUS Champions Trophy : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलं
Ind vs Aus Semi-Final Score : किंग कोहलीने दिलं ऑस्ट्रेलियाला रिटर्नचं तिकीट, भारत थेट फायनलमध्ये विराजमान!
भारताने ऑस्ट्रेलियाला रिटर्नचं तिकीट दिले आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला आणि थेट फायनलमध्ये विराजमान झाले. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडशी होऊ शकतो. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 84 धावांची खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, या काळात कोहलीचे शतक 16 धावांनी हुकले. भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. भारत अंतिम फेरीत पोहोचल्याने आता अंतिम सामना दुबईमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.