Illegal Mining | राजाश्रय असल्याशिवाय माफिया तयार होत नाही, मोहित पाटील स्पष्ट बोलले
Continues below advertisement
नरेश मोहिते पाटील यांनी केलेल्या आरोपांनुसार वनखात्याच्या जमिनीतून लाखो रुपयांचा मुरूम बेकायदेशीरपणे काढण्यात आला आहे. जप्त केलेला JCB ग्रामस्थांनी दमबाजी करून सोडवून दिला, असा लेखी खुलासा वनविभागाने केला आहे. या प्रकरणात DYSP यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. वनविभागाने दखल घेऊनही कारवाई झाली नाही, असा आरोप नरेश मोहिते पाटलांनी केला आहे. पोलिसांना खरे माफिया कोण आहेत हे माहीत आहे. "राजाश्रय असल्याशिवाय हे माफिया तयार होत नाहीत," असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई झाली आहे. एक महिला सरपंच आणि ग्रामसेवक यांना निष्पाप असूनही बळी दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना मोकळा हात देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. Collector, SP, वन उपवन निरीक्षक आणि DYSP यांना खरे माफिया पुढे आणण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement