एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Burning Bus Tragedy: 'मोबाईलमुळे १९ प्रवाशांचा मृत्यू? बसमध्ये मोबाईलचा स्फोट? १९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
हैदराबादहून बंगळूरूला जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवासी आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. 'बसला आग लागल्यानंतर बॅटरी फुटण्याचे आवाज आल्याचं' प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ई-कॉमर्स कंपनीचे २३४ मोबाईल फोन बसमधून नेले जात होते आणि त्यांच्या बॅटरीमुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ओंकार' नावाच्या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. शेतात नुकसान केल्यानंतर हा हत्ती थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आणि वाहतूक थांबवण्यात आली. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असून, त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















