Ranichi Baug Closed : पूर्वसूचना न देता राणीची बाग अचानक बंद, पर्यटक संतापले

Continues below advertisement
दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतील वीर माता जिजाबाई उद्यान (राणीची बाग) अचानक बंद ठेवल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले. प्रशासनाने पूर्वसूचना न दिल्याचा दावा करत जळगाव आणि पुण्यासारख्या दूरच्या ठिकाणांहून आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 'त्यांचे हाल यांना बघवत नाही, त्यांच्यासाठी राणीबाग खुले ठेवायला पाहिजे ना?' असा संतप्त सवाल एका स्थानिक नागरिकाने केला. एरवी दर बुधवारी देखभालीसाठी बंद असणारी राणीची बाग, त्या आठवड्यात बुधवारी खुली ठेवण्यात आली आणि त्याऐवजी शुक्रवारी बंद करण्यात आली. पालिकेने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात आणि प्रेस नोटद्वारे माहिती दिल्याचा दावा केला असला तरी, ही माहिती लोकांपर्यंत न पोहोचल्याने बागेबाहेर मोठी गर्दी जमली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्राणी पाहण्यासाठी आलेल्या लहान मुलांचा मोठा हिरमोड झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola