Holi Rangapanchami 2023 : शिर्डी, तुळजापूर ते पंढरपूर... देवाजीच्या द्वारी रंगसत्संग
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHoli Rangapanchami 2023 : शिर्डी, तुळजापूर ते पंढरपूर... देवाजीच्या द्वारी रंगसत्संग
आज राज्यभरातील देवस्थानांमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आलीय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही रंगपंचमीनिमित्त विविध रंगांची उधळण करण्यात आली. कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांसाठी खास रंगपंचमीच आयोजन केलं होतं. शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर साईभक्तांनी रंगपंचमी साजरी केली. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या पालखीला गाऱ्हाणं घालून परंपरेनुसार पोलीसांकडून सलामी दिली गेली..पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही रंगोत्सव साजरा करण्यात आला. साई भक्तांचा आनंद द्विगुणित केला.