Sindhudurg: सिंधुदुर्गात 192 वस्त्यांची जातीवाचक नावं बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय
Continues below advertisement
कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातून एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांनी जिल्ह्यातील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर ब्याण्णव वस्त्यांची आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे'. या निर्णयामुळे हरिजन वाडी, चर्मकार वाडी, बौद्ध वाडी अशी नावं आता इतिहासजमा होणार आहेत. जातीवर आधारित नावं बदलून त्याऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावं दिली जाणार आहेत. असा निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement