एक्स्प्लोर
Wardha Hingaghat Nylon Manja : नायलॉन मांजामुळे पुन्हा अपघात, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये नायलॉन मांजामुळे झालेला अपघात पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सुशील क्षीरसागर (Sushil Kshirsagar) हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. 'जनतेने हा मांजा वापरू नये आणि प्रशासनाने यावर बंदी आणावी', असे भावनिक आवाहन जखमी सुशील यांनी केले आहे. हिंगणघाटच्या कोसरा येथील रेल्वे पुलाजवळून बाईकने जात असताना क्षीरसागर यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला. प्रसंगावधान राखत त्यांनी मांजा हाताने बाजूला केला, पण यात त्यांच्या गळ्याला चार टाके पडले असून हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा मित्रही जखमी झाला. नायलॉन मांजावर महाराष्ट्रात बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement















