एक्स्प्लोर
Parbhani Heavy Rain : परभणीत पुन्हा जोरदार पाऊस, शेळ्या गेल्या वाहून; शेतकऱ्यांचं नुकसान
परभणी जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचले. यामुळे शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पशुधन देखील वाहून गेले. परभणी जिल्ह्यातील आर्वी गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. गावातील ओढ्याला मोठे पाणी आले. यामध्ये गोदाबाई इकर यांच्या तीन ते चार शेळ्या वाहून गेल्या. या नुकसानीमुळे त्यांना अश्रू अनावर झाले. गावामध्ये प्रत्येकाचेच मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















