एक्स्प्लोर
Parbhani Heavy Rain : परभणीत पुन्हा मुसळधार, उरलंसुरलं सगळंच पीक नष्ट झालं
परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे हिरावून घेतले गेले आहे. परभणीमध्ये पहाटे झालेल्या पावसामुळे ओढे आणि नदीनाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांसोबत प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी बातचीत केली. पूर्णा आसोला शिवारामध्ये जवळपास पंचवीस ते तीस हेक्टर शेतीचा पट्टा पाण्याखाली गेला आहे. नदीचा प्रवाह पलीकडे असतानाही नदीचे पाणी अलीकडे आले आहे. 'पाणी कधीच नाही पोहोचलं. काल दोन तासांमध्ये असं एकदम ढगफुटी झाल्यावर मान झालं,' असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतातच नाही तर गावांमध्येही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. 'रात्रीचा पाऊस झाला आहे. पाऊस दीड पावणे दोन तासांत पडला मात्र पाणी जास्त पडले,' असेही एका शेतकऱ्याने नमूद केले. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















