Heavy Rain Alert | मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे-सातारा घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 24 तासांसाठी सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून रायगड आणि पालघर जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडला.
मुंबई : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील 24 तासात मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. काल मुंबईत 142.6 मिमी पावसाची नोंद झाली होती.
राज्यात मागील 24 तासांमध्ये (19 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात 142.06 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात 134.1 मिमी, पालघर 120.09 मिमी, ठाणे 90.03 मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 60.05 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची सरासरी आकडेवारी
ठाणे 90.03 रायगड 134.1, रत्नागिरी 60.09, सिंधुदुर्ग 9.4, पालघर120.9, नाशिक 40.03, धुळे 25.5, नंदुरबार 33.4, जळगाव 4.7, अहिल्यानगर 8.7 पुणे 29.3, सोलापूर 0.3, सातारा 17.07, सांगली, कोल्हापूर12.1, छत्रपती संभाजीनगर 4.5, जालना 2.1, बीड 0.2, धाराशिव 0.2, नांदेड 0.6, परभणी 0.5, हिंगोली 0.8, बुलढाणा 3.1, अकोला 8.6, वाशिम 1.7 अमरावती 5.9, यवतमाळ 1.2, वर्धा 3.2, नागपूर 0.7, भंडारा 0.3,चंद्रपूर 4.3 आणि गडचिरोली जिल्ह्यात 0.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
















