Sangram Jagtap : संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानं नवा वाद, जलील काय म्हणाले?

Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) हिंदू जन आक्रोश मोर्चात (Hindu Jan Akrosh Morcha) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला आहे. 'यंदाच्या दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा, आपला पैसा फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच मिळाला पाहिजे', असे आवाहन संग्राम जगताप यांनी केले. या वक्तव्यानंतर एमआयएमचे (AIMIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात टिकण्यासाठी मुस्लिम समाजाला शिव्या देणारे 'नवीन नवीन पिल्लू' तयार होत आहेत, अशा शब्दांत त्यांनी जगताप यांच्यावर टीका केली. पोलिसांनी अशा प्रक्षोभक भाषणांवर गुन्हा दाखल करावा, मग तो इम्तियाज जलील असला तरी चालेल, असेही ते म्हणाले. जगताप यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola