Voter List : मतदार यादीतील दुबार नावांविषयी चौकशी झाली पाहिजे

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सदोष मतदार याद्यांच्या (Voter List) मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांनी 'विरोधकांना या निवडणुका आता झाल्या तर पराभव त्यांच्या समोर दिसायला लागलेला आहे, त्यामुळे त्यांना निवडणुका पुढे ढकल्या पाहिजेत,' असं म्हणत विरोधक पराभवाच्या भीतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) टाळत असल्याचा आरोप केला. मतदार यादीतील चुका प्रशासन दुरुस्त करेल आणि निवडणुका वेळेवरच व्हायला हव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. याच मतदार याद्यांवर लोकसभा निवडणुका झाल्याची आठवणही त्यांनी करून दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'सारखी सारखी कर्जमाफी कशासाठी?' असा सवाल केल्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही नवीन चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola