Gujarat Cabinet Reshuffle: पटेलांच्या बैठकीनंतर गुजरातमध्ये राजकीय भूकंप, सर्व मंत्र्यांचे राजीनामे
Continues below advertisement
गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सर्व सोळा मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले, ज्यामुळे नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा आणि जे. पी. नड्डा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या फेरबदलात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्यासह सौराष्ट्रामधील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटीदार समाजाला मंत्रिमंडळात विशेष प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement