Nilesh Ghaywal Passport Row : घायवळ बंधू प्रकरणी राम शिंदेंचं आरोप,रोहित पवार आरोपीच्या पिजऱ्यात
Continues below advertisement
पुण्यातील गुंड निलेश घायवड (Nilesh Ghaywad) आणि सचिन घायवड (Sachin Ghaywad) यांच्या पासपोर्ट आणि शस्त्र परवाना (Arms License) प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या वादाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) आहेत. 'निलेश घायवडला पासपोर्ट महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आणि रोहित पवारांमुळेच मिळाला', असा थेट आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर घायवडला मदत केल्याचे आरोप केले होते, मात्र आता शिंदे यांच्या या नव्या दाव्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, घायवडच्या मामांनीच सांगितले की, २०२० साली अनिल देशमुख यांच्या मदतीने हा पासपोर्ट मिळाला होता, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. याशिवाय, सचिन घायवडच्या शस्त्र परवान्यावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement